
नवी दिल्ली : हिंदू धार्मिक संस्था आणि वक्फ बोर्ड यांची तुलना करणे चुकीचे आहे, असे सांगतानाच वक्फ बोर्डावर बिगरमुस्लिम सदस्यांची नेमणूक करण्यात गैर काहीच नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात घेतली आहे. वक्फ कायद्याला हंगामी स्थगिती न देता संपूर्ण सुनावणी घेऊन अखेरीस निकाल द्यावा, अशी विनंती सरकारने प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून केली.