Shivraj Singh Chouhan :सिक्कीमच्या कृषी विकासासाठी केंद्र सरकारचा सक्रिय पाठिंबा मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी दिली. त्यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन राज्याच्या शेतीविषयक गरजांवर चर्चा केली.
गंगटोक : सिक्कीम राज्याच्या शेतीविषयक विकासासाठी मोठा टप्पा गाठण्याच्या दिशेने सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी नुकतीच केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतली.