esakal | महाराष्ट्राने ५६% कोरोना लसी वापरल्या नाहीत, जावडेकरांचा गंभीर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्राने ५६% कोरोना लसी वापरल्या नाहीत, जावडेकरांचा गंभीर आरोप

केंद्र सरकारनं दिलेल्या लसीचा महाराष्ट्र सरकारनं पूर्णपणे वापर न केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

महाराष्ट्राने ५६% कोरोना लसी वापरल्या नाहीत, जावडेकरांचा गंभीर आरोप

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

केंद्र सरकारनं दिलेल्या लसीचा महाराष्ट्र सरकारनं पूर्णपणे वापर न केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये जावडेकर म्हणालेत की, 'केंद्रानं महाराष्ट्राला ५४ लाख कोरोना लसीचे डोस दिले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रानं आतापर्यत २३ लाख लसीचा वापर केला आहे. १२ मार्चपर्यंत महाराष्ट्र सरकारकडे ५६ टक्के कोरोना लसीचे डोस पडून आहेत. आणि आता शिवसेना खासदार राज्यसभेत आणखी कोरोना लसीची मागणी करत आहेत. आधी कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवताना नियोजनाचा अभाव आणि आता लसीकरणामध्ये चुकीचं व्यवस्थापन.'  शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी महाराष्ट्राला आणखी लसीची गरज असल्याची मागणी केली होती. त्याधर्तीवर प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत  महाराष्ट्र सरकारच्या काराभारावर नाराजी व्यक्त केली.

राज्यसभेमध्ये बोलातना शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी महाराष्ट्राला अधिक प्रमाणात लसींचे डोस देण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर जावडेकरांनी हे ट्विट केलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेऊन राज्याला २ कोटी २० लाख डोस उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आता याच लसीकरणाच्या मुद्द्यावरुन राजकारण सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे.

देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून याचा सर्वाधिक फठका महाराष्ट्राला बसला आहे. देशातील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ५० टक्केंपेक्षा जास्त आहे. त्यामुले केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नाराजीही व्यक्त केली होती. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. 
 

loading image
go to top