दुसरी जात नाही, तोच तिसऱ्या लाटेची भीती; केंद्र सरकार म्हणतं

Corona
Corona esakal
Summary

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्याचच केंद्राने तिसऱ्या लाटेबाबत इशारा दिला आहे. तिसरी लाट येणे अपरिहार्य असल्याचं केंद्राकडून सांगण्यात आलंय.

नवी दिल्ली- देशात कोरोनाच्या (corona second wave) दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्याचच केंद्राने तिसऱ्या लाटेबाबत इशारा (third Covid 19 wave) दिला आहे. तिसरी लाट येणे अपरिहार्य असल्याचं केंद्राकडून सांगण्यात आलंय. सरकारचे कोरोनासंबंधीचे प्रमुख सल्लागार के. विजयन राघवन म्हणाले की, "देशात कोरोनाची तिसरी लाट नक्की येईल. पण ती कधी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेपासून आपण तयार राहायला हवं." एनआयएने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (Centre warns third Covid 19 wave inevitable We should prepare)

देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून ती घातक असल्याचं दिसून येतंय. मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोनाची बाधा होत आहे, तसेच हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयानक असल्याचं दिसतंय. 22 एप्रिलपासून देशात 3 लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना बाधितांच्या संख्येत 4 लाखांचा आकडाही देशाने गाठला आहे. 1 मे रोजी 401,993 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. दररोज 3 हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे.

दुसऱ्या लाटेचा कहर सुरु असतानाच तिसऱ्या लाटेची चिंता सतावू लागली आहे. नव्या व्हॅरेएन्टबाबत बोलताना राघवन म्हणाले की, ''नवा स्ट्रेन जास्त प्रमाणात लोकांना बाधित करु शकतो. लस सध्याच्या स्ट्रेनवर प्रभावी आहे. पण, नवा व्हॅरेएन्ट भारतासह देशभरात पसरत आहे. देशात तिसरी लाट येणं निश्चित आहे. पण, ती कधी येईल हे सांगता येत नाही. पण, आपण तिसऱ्या लाटेसाठी तयार राहायला हवं."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com