Ram Temple Inauguration: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला अडवाणींना येऊ नका म्हणून सांगितलं; पण का? चंपत राय म्हणाले...

अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख (२२ जानेवारी) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.
champat rai on lal krishna advani murli manohar joshi not attending ram mandir inauguration in Ayodhya
champat rai on lal krishna advani murli manohar joshi not attending ram mandir inauguration in Ayodhya

Ram Temple Inauguration : अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख (२२ जानेवारी) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या सोहळ्याला अनेक दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार नाहीयेत. त्यांना या कार्यक्रमाला येऊ नका असे सांगण्यात आले आहे. राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

चंपत राय यांनी माध्यमांशी बोलताना मुरली मनोहर जोशी आण लाल कृष्ण आडवाणी यांना आरोग्याच्या समस्या आणि वाढलेल्या वयामुळे या कर्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाहीत. दोघेही वृद्ध आहेत, त्यामुळे त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना न येण्याची विनंती करण्यात आली, दोन्ही नेत्यांनी ही विनंती मान्य देखील केली आहे.

राम मंदिर ट्रस्टने महासचिव चंपत राय यांनी प्रेस कॉन्फ्रसमध्ये सांगितलं की, अडवाणीजी यांचं तेथे असणं अनिवार्य आहे, मात्र त्यांचं वय पाहाता आमची विनंती आहे की त्यांनी येऊ नये. यानंतर मुरली मनोहर जोशी यांच्याबद्दल ते म्हणाले की, डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत माझं स्वतः बोलणं झालं आहे. मी त्यांना फोनवर सांगतलं की तुम्ही येऊ नका मात्र ते हट्ट करत होते की मी नक्की येईन. मी वारंवार निवनंती करत होतो की गुरूजी येऊ नका. तुमचं वय आणि थंडी.. तुमचे घुडघे देखील बदलले आहेत.

champat rai on lal krishna advani murli manohar joshi not attending ram mandir inauguration in Ayodhya
Parliament Breach : घुसखोरी प्रकरणानंतर मोठा खुलासा! संसदेत सुरक्षा कर्मचाऱ्यांचं शॉर्टेज; 72 ऐवजी फक्त दहाच ऑफिसर

२२ जानेवारी रोजी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी तयारी केली जात आहे. सोमवारी (१८ डिसेंबर) रोजी पत्रकार परिषदेत चंपत राय यांनी सांगितलं की, पीएम मोदी ११ वाजता रामजन्मभूमी परिसरात दाखल होतील, साडे अकरा वाजेपर्यंत प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी पोहचतील.

champat rai on lal krishna advani murli manohar joshi not attending ram mandir inauguration in Ayodhya
पाच हजार हिरे, दोन किलो चांदी; हिऱ्याच्या व्यापाऱ्याने बनवलं खास 'राम मंदिर थीम' नेकलेस, पाहा Video

अजून कोण कोण असणार...

चंपत राय यांनी सांगितलं की, २३ जानेवारी पासून सामान्य नागरिकांना प्रभू श्री राम दर्शन घेता येणार आहे. मंदिराच्या उद्धाटनासाठी पीएम मोदी, सर संघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि ट्रस्टी राम मंदिर परिसरात उपस्थित असतील. याव्यतिरीक्त अनेक मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com