
नवी दिल्ली : तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. ‘‘ते सज्जन व्यक्ती आणि देशभक्त आहे,’’ अशा शब्दात चंद्राबाबू नायडू यांनी राधाकृष्णन यांची प्रशंसाही केली.