esakal | 'चांद्रयान-2' करणार 20 ऑगस्टला चंद्रकक्षेत प्रवेश!
sakal

बोलून बातमी शोधा

K Sivan ISRO

येत्या डिसेंबरमध्ये 'इस्रो' काही छोटे उपग्रह अवकाशात सोडणार आहे. यासाठी नव्या छोट्या प्रक्षेपकाचा वापर करण्यात येण्याची शक्‍यता आहे.

'चांद्रयान-2' करणार 20 ऑगस्टला चंद्रकक्षेत प्रवेश!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

अहमदाबाद : भारताचे महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान-2' 20 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, तसेच ते 7 सप्टेंबर रोजी ते चंद्रावर उतरेल, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी आज (सोमवार) सांगितले. 

भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी निमित्तच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सिवान येथे आले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ''चांद्रयान-2चे 22 जुलै रोजी प्रक्षेपण केल्यानंतर आतापर्यंत त्याची कक्षा पाच वेळा उंचावण्यात आली आहे. सध्या ते पृथ्वीभोवती परिभ्रमण करत आहे. हे यान 20 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. तेथेही त्याची कक्षा काही वेळा बदलण्यात येईल, आणि अखेरीस सात सप्टेंबर रोजी चांद्रयान-2मधील बग्गी चंद्रावर उतरेल.'' 

येत्या डिसेंबरमध्ये 'इस्रो' काही छोटे उपग्रह अवकाशात सोडणार आहे. यासाठी नव्या छोट्या प्रक्षेपकाचा वापर करण्यात येण्याची शक्‍यता आहे.

loading image