Chandrayaan 3 : आदिपुरुषचे बजेट 700 कोटींचे, चांद्रयानचा खर्च 615 कोटींचा!

आपण देशातील एखाद्या महत्वाच्या प्रकल्पाची अशाप्रकारे तुलना करु नये याकडे काही नेटकऱ्यांनी लक्ष वेधले आहे.
Chandrayaan 3
Chandrayaan 3 esakal
Updated on

Chandrayaan 3 Is Allegedly Cheaper Than Om Raut's 'Adipurush' : आदिपुरुषची जेवढी चर्चा झाली तेवढ्या प्रमाणात हा चित्रपट काही चालला नाही. निर्मात्यांनी बॉक्स ऑफिसकडून जितकी अपेक्षा केली होती त्याला तेवढं यश मिळालं नाही. आता आदिपुरुष पुन्हा एका चर्चेत आला आहे. त्याचे कारण चांद्रयान आहे. चांद्रयान ३ आणि आदिपुरुषमध्ये बजेटनुसार तुलना होऊ लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आदिपुरुष आणि चांद्रयान यांची वेगळ्या अर्थानं चर्चा होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही पोस्टनुसार ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुषचे बजेट ७०० कोटी एवढे होते तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब असणाऱ्या चांद्रयान ३ चे बजेट ६१५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून या दोन्ही विषयांवरील पोस्ट व्हायरल केल्या आहेत.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

नेटकऱ्यांनी तर अॅव्हेंजर्समधील सुपरहिरोची आणि भारतीय चांद्रयान३ ची तुलना होताना दिसत आहे. मात्र अनेकांनी त्यावर सडकून टीका केली आहे. चित्रपट आणि खगोल संशोधन, तो महत्वकांक्षी प्रकल्प याची तुलना होऊ शकत नाही. हे तुलना करणाऱ्यांनी लक्षात घेण्याची गोष्ट आहे.

आपण देशातील एखाद्या महत्वाच्या प्रकल्पाची अशाप्रकारे तुलना करु नये याकडे काही नेटकऱ्यांनी लक्ष वेधले आहे. दुसरीकडे आपण कोणत्या गोष्टीसाठी किती आणि कसे पैसे खर्च करतो यावर देखील नेटकरी बोलताना दिसत आहे.

Chandrayaan 3
Kajol News : 'तिचे काय चुकले? पण चौथी पास राजाचे अंधभक्त…'; ठाकरे गटाकडून काजोलची पाठराखण

आदिपुरुष प्रदर्शित होऊन महिना लोटून गेल्यानंतरही या चित्रपटावर नेटकरी सडकून टीका करत आहे. त्यात काही जणांना चांद्रयान ३ मोहिमेची आणि आदिपुरुषची तुलना करण्याचा मोह झाला. म्हणून त्यांनी दोन्ही प्रोजेक्टच्या बजेटवर बोलण्यास सुरुवात केली. ट्विटवर त्याविषयीचे वेगवेगळे मीम्स देखील व्हायरल झाले आहेत. काही जणांनी आपल्याकडे कोणत्या गोष्टीला कसे महत्व दिले जाते याचे उदाहरण आदिपुरुष आणि चांद्रयानकडे पाहिल्यावर कळते. असे म्हटले आहे.

यात पहिली गोष्ट म्हणजे जो प्रकल्प आपल्या देशासाठी इतका महत्वाचा आहे त्या चांद्रयानाचे बजेट सहाशे कोटींच्या घरात आहे. दुसरीकडे एका चित्रपटावरील खर्च हा सातशे कोटींचा आहे. यावरुन आपण कशाला जास्त प्राधान्य देतो हे कळून येते. असाही सूर काही नेटकऱ्यांनी आळवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com