Jagannath Rathyatra : अहमदाबाद रथयात्रेदरम्यान डीजेच्या मोठ्या आवाजामुळे हत्ती बिथरल्याने दोन भाविक जखमी झाले, वन अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून मोठी दुर्घटना टळवली.
अहमदाबाद : अहमदाबादमध्ये भगवान जगन्नाथाची १४८ वी रथयात्रा शुक्रवारी पार पडली. यात्रेत सकाळी सव्वादहाच्या सुमारास डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे एक हत्ती बिथरला. बॅरिकेड तोडून तो एका गल्लीत घुसला. यामुळे झालेल्या पळापळीत दोन भाविक जखमी झाले.