
छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी, तालकटोरा स्टेडियम, दिल्ली : पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी प्रवेशपत्रांचा गोंधळ, उद्घाटन सोहळ्यावेळी महामंडळाच्याच पदाधिकाऱ्यांना प्रवेशद्वारावर ताटकळत उभे राहावे लागले, समन्वयाअभावी कोलमडलेले वेळापत्रक असा अभूतपूर्व सावळागोंधळ ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिसून येत आहे. संमेलनाची व्यवस्था पाहणाऱ्या यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे संमेलन जणू ‘रामभरोसे’ असल्याचे चित्र दिसून आले.