esakal | पंजाबमध्ये चाललंय तरी काय? आता CM चन्नी गेले मोदींच्या भेटीला
sakal

बोलून बातमी शोधा

charanjit-singh-channi
काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह हे सुद्धा अमित शहांच्या भेटीला गेले होते.

पंजाबमध्ये चाललंय तरी काय? आता CM चन्नी गेले मोदींच्या भेटीला

sakal_logo
By
सुधीर काकडे

गेल्या काही दिवसांपासून पंजाबच्या राजकारणात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी थांबायचं नाव घेत नाहीयेत. कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्या नाराजी नाट्यामुळे पंजाबचे राजकारण सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्यातच आता पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी (Charanjit Singh Channi) हे आता दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत जाऊन चन्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. चरणजित सिंग चन्नी हे दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायला गेले आहेत, अशी माहिती पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यलयाने दिली आहे. त्यामुळे त्यांच्या या भेटीत आता नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग अमित शहांच्या भेटीला गेले होते.

पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर मोठे राजकीय घमासान सुरू आहे. पंजाबमध्ये सुरू असलेल्या घडामोडींबद्दल काँग्रेसमधील जी-२३ गटाचे नेते कपिल सिब्बल आणि पी चिदंबरम यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर बोलताना कपिल सिब्बल यांनी काँग्रेस नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच एखाद्या गोष्टीला मर्यादा असतात असे म्हणत, त्यांनी काँग्रेस अध्यक्ष निवडण्यासाठी होणाऱ्या दिरंगाईवर देखील प्रश्न उपस्थित केला आहे.

loading image
go to top