Chardham Yatra: चारधाम यात्रेचा शंखनाद! गंगोत्री-यमुनोत्रीचे कपाट उघडले; पहिली पूजा PM मोदींच्या नावाने, का आहे स्पेशल?

Gangotri and Yamunotri Temple Gates Open:उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेचा शुभारंभ! गंगोत्री व यमुनोत्री धामाचे कपाट उघडले गेले, पहिली पूजा पंतप्रधान मोदी यांच्या नावाने.
Chardham Yatra

Chardham Yatra

esakal

Updated on

देवभूमी उत्तराखंडमध्ये मंगळवारपासून (२० एप्रिल २०२६) चारधाम यात्रेचा दिमाखदार प्रारंभ झाला आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर गंगोत्री आणि यमुनोत्री या दोन्ही धामांचे कपाट भाविकांसाठी उघडण्यात आले. या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही धामांमध्ये पहिली पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने करण्यात आली.

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते. यात्रेच्या पहिल्याच दिवशी देवभूमीत भक्तीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com