Chardham Yatra 2026: चारधाम यात्रेचा नवा विक्रम? १० लाख नोंदणी , मुख्यमंत्र्यांचा 'सेफ यात्रा' प्लॅन तयार, जाणून घ्या तयारी

Uttarakhand Tourism: चारधाम यात्रा 2026 साठी आतापर्यंत 10 लाख भाविकांनी नोंदणी केली असून, यंदा विक्रमी गर्दीची शक्यता आहे. उत्तराखंड सरकारने सुरक्षिततेला प्राधान्य देत पायाभूत सुविधा, आपत्ती व्यवस्थापन आणि वैद्यकीय सेवा मजबूत केल्या आहेत.
Chardham Yatra 2026

Chardham Yatra 2026

sakal

Updated on

उत्तराखंडमध्ये १९ एप्रिल २०२६ पासून सुरू होणाऱ्या विश्वप्रसिद्ध चारधाम यात्रेसाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेताना सांगितले की, आतापर्यंत १० लाख भाविकांनी नोंदणी (Registration) पूर्ण केली असून, सर्वांना सुरक्षित दर्शन घडवणे ही सरकारची जबाबदारी आहे. गेल्या वर्षी (२०२५) आपत्तीमुळे दीड महिना यात्रा विस्कळीत होऊनही ५१ लाख भाविकांनी दर्शन घेतले होते. यंदा हा आकडा नवा विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com