सत्य दाखविल्याबद्दल पत्रकारांवर आरोप

रॉयटर्स
मंगळवार, 10 जुलै 2018

म्यानमारच्या गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याचा आरोप "रॉयटर्स' या वृत्तसंस्थेच्या दोन पत्रकारांवर ठेवण्यात आला असून, त्यांना सुनावणीस सामोरे जावेच लागेल, असे येथील न्यायालयाने आज स्पष्ट केले. न्यायालयाच्या या निर्णयावर "रॉयटर्स'ने नाराजी व्यक्त केली आहे. या दोघांनी केवळ वास्तव दाखवून आपले काम चोख बजावले होते, असे "रॉयटर्स'ने म्हटले आहे. 
 

यंगून : म्यानमारच्या गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याचा आरोप "रॉयटर्स' या वृत्तसंस्थेच्या दोन पत्रकारांवर ठेवण्यात आला असून, त्यांना सुनावणीस सामोरे जावेच लागेल, असे येथील न्यायालयाने आज स्पष्ट केले. न्यायालयाच्या या निर्णयावर "रॉयटर्स'ने नाराजी व्यक्त केली आहे. या दोघांनी केवळ वास्तव दाखवून आपले काम चोख बजावले होते, असे "रॉयटर्स'ने म्हटले आहे. 

वा लोन आणि क्‍याव सो अशी या दोन पत्रकारांची नावे आहेत. आरोप सिद्ध झाल्यास या दोघांना चौदा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. या दोघांनी गेल्या वर्षी रोहिंग्या मुस्लिमांवर सैनिकांकडून आणि जनतेकडून होणाऱ्या अत्याचारांबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यांनी दहा रोहिंग्यांची हत्या केला जात असल्याच्या घटनेचे चित्रणही केले होते. त्यांच्या या अहवालामुळे म्यानमार सरकारला सैनिकांकडून अत्याचार होत असल्याच्या घटनेची कबुली द्यावी लागली होती. या सैनिकांवर कारवाई करतानाच सरकारने गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याप्रकरणी या दोघा पत्रकारांनाही गेल्या वर्षी अटक केली होती. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरून म्यानमारच्या या कृतीवर टीका झाली होती.

Web Title: Charges against journalists for showing the truth