
भोपाळ : आफ्रिकेतील बोट्सवानातून आठ चित्ते लवकरच भारतात आणले जाणार असून, त्यापैकी पहिले चार चित्ते पुढील महिन्यापर्यंत येणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मध्य प्रदेश सरकारच्या निवेदनानुसार, चित्ता प्रकल्पाची शुक्रवारी आढावा बैठक झाली आणि यात राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या (एनटीसीए) अधिकाऱ्यांनी बोट्सवानातून चित्ते आणणार असल्याची माहिती दिली. या बैठकीस केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि मुख्यमंत्री मोहन यादव उपस्थित होते.