बॉस असावा तर असा! सव्वा कोटी खर्च करून कर्मचाऱ्यांना दिलं दिवाळी गिफ्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॉस असावा तर असा! सव्वा कोटी खर्च करून कर्मचाऱ्यांना दिलं दिवाळी गिफ्ट

बॉस असावा तर असा! सव्वा कोटी खर्च करून कर्मचाऱ्यांना दिलं दिवाळी गिफ्ट

Diwali Gift दिवाळीचा सण जवळ आला आहे. या काळात व्यावसायिक आपल्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देत असतात. पण चेन्नईमधील एका व्यावसायिकाने आपल्या कर्मचाऱ्यांना आणि सहकाऱ्यांना चक्क 1.2 कोटी रुपयांच्या कार आणि बाईक भेट देऊन कर्मचाऱ्यांना आश्चर्यचकित केले आहे. चलनी ज्वेलरीचे मालक जयंती लाल चैंती यांनी त्यांचे कर्मचारी आणि सहकार्‍यांना आठ कार आणि 18 बाइक भेट दिल्या.

कर्मचाऱ्यांना भेटवस्तू पाहून सुखद धक्का बसला आहे, तर काहींना आनंदाश्रू अनावर झाले. जयंती लाल म्हणाले की, त्यांचे कर्मचारी हे त्यांच्या कुटुंबासारखे आहेत आणि प्रत्येक चढ-उतारात त्यांनी त्यांच्यासोबत काम केले आहे. ते म्हणाले की ही भेट त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात काहीतरी विशेष जोडण्यासाठी आहे.

हेही वाचा: राष्ट्रवादीलाही खिंडार पडणार? शिंदे गटातील मंत्र्याचं सूचक विधान

त्यांनी माझ्या व्यवसायातील चढ-उतारांवर माझ्यासोबत काम केलं आहे. आणि मला व्यवसायात खुप मदत केली आहे. ते पुढे म्हणाले, ते फक्त कर्मचारी नाहीत तर माझे कुटुंब आहेत. त्यामुळे त्यांना असे सरप्राईज देऊन माझ्या कुटुंबियांप्रमाणे वागावे असे मला वाटत होते. तेव्हापासून मी खूप आनंदी आहे. प्रत्येक बॉसने आपल्या कर्मचारी आणि सहकाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला पाहिजे.