Chennai Crime : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तमिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजींना अटक

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तमिळनाडूचे ऊर्जा मंत्री व्ही.सेंथिल बालाजी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याखाली (पीएमएलए) बुधवारी अटक केली.
senthil balaji
senthil balajisakal

चेन्नई - आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तमिळनाडूचे ऊर्जा मंत्री व्ही.सेंथिल बालाजी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याखाली (पीएमएलए)बुधवारी अटक केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. स्थानिक न्यायालयाने त्यांना २८ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणेकडून अशा प्रकारची कारवाई झालेले सेंथिल (वय ४७) मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील पहिले मंत्री आहेत. ‘ईडी’च्या सदस्यांनी मंगळवारी (ता.१३) सेंथिल यांच्या निवासस्थानी व सचिवालयातील त्यांच्या कार्यालयात सकाळी छापा घालून त्यांची चौकशी सुरू केली होती. सुमारे २४ तास ही चौकशी सुरू होती. यावेळी छातीत दुखत असल्याची तक्रार सेंथिल यांनी केली होती.

senthil balaji
Garibrath Express : गरीबरथ एक्स्प्रेस ट्रेनच्या एसी कोचला लागली आग, प्रवाशांचा उडाला गोंधळ

तपासणीसाठी त्यांना चेन्नईतील एका सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी ते रडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रुग्णालयाच्या निवेदनानुसार सेंथिल बालाजी यांची अँजिओग्राफी करण्‍यात आली असून लवकरात लवकर बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे.

बालाजी यांना ‘ईडी’ने अटक केल्यानंतर द्रमुकचे अध्यक्ष व तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. ‘बालाजी यांच्याविरोधात ‘ईडी’ने काल घातलेला छापा म्हणजे ‘धमकीचे राजकारण’ आहे,’ असे सांगत त्यांनी भाजपवर हल्ला चढविला. ‘ईडी’चे अधिकारी चौकशीच्या नावाखाली नाटक करीत करून बालाजी यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप त्यांनीही केला. या प्रकरणात बालाजी हे कायदेशीरपणे सामोरे जातील आणि त्यांचा पक्षही कायद्याचे पालन करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, भाजपच्या प्रदेश कार्यालयाने द्रमुक आणि स्टॅलिन यांचे आरोप फेटाळले.

अण्णा द्रमुक ते द्रमुक प्रवास

सेंथिल बालाजी हे तमिळनाडूतील प्रभावशाली नेते आहेत. तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णा द्रमुक पक्षाकडून त्यांनी २००६ मध्ये विधानसभा निवडणूक लढविली होती आणि करूरमधून ते विजयी झाले होते. २०११ ते २०१५ या काळात ते राज्याचे परिवहन मंत्री होते. जयललिता यांच्या मृत्यूनंतर ते अण्णा द्रमुकमधून बाहेर पडले व द्रमुकला जवळ केले. २०२१मधील विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले होते.

senthil balaji
Uniform Civil Code: लोकसभेसाठी मोदी सरकारचा हुकमी एक्का बाहेर येणार! समान नागरी कायद्याबाबत मोठी अपडेट

आम्ही घाबरणार नाही

व्ही.सेंथिल बालाजी यांच्यावरील ‘ईडी’ कारवाईचा निषेध काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी केला आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी याबाबत आज निवेदन प्रसिद्ध केले आहे. ‘हे दुसरे-तिसरे काही नसून राजकीय छळ आहे., जो मोदी सरकारकडून विरोधकांचा केला जातो. पण अशा प्रकारच्या कारवाईने विरोधक घाबरणार नाहीत,’ असेही मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

ही कारवाई म्हणजे ‘ईडी’चा दुरुपयोग आहे.

- सौगत रॉय, खासदार, तृणमूल काँग्रेस पक्ष

नितीश कुमार यांनी २३ जून रोजी पाटण्यात आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीमुळे घाबरलेल्या आणि निराशेतून नरेंद्र मोदी सरकारने बालाजी यांच्या निवासस्थानावर छापा घातला आहे.

- ललनसिंह, अध्यक्ष, जेडीयू

senthil balaji
Kolkata News : कोलकाता विमानतळावर भीषण आग, विमानांची ये-जा थांबवली

आरोपपत्रात आतापर्यंत माझे नाव नाही. पण देशात विरोधकांना लक्ष्य केले जात असेल तर एखादे पुरवणी आरोपपत्र तयार करून माझेही नाव जोडले जाऊ शकते.

- तेजस्वी यादव, उपमुख्यमंत्री, बिहार

तमिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी यांच्यावरील केंद्र सरकार आणि त्यांच्या तपास यंत्रणांद्वारे सूडाच्या या आणखी एका कारवाईबद्दल आश्‍चर्य वाटायला नको. २०२४ सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत हे सुरूच राहील. कोणतीही चूक करू नका, आम्ही लढू, आम्ही जिंकू. स्टॅलिन यांच्याबरोबर आमची एकजुटीने उभे आहोत.

- लालू प्रसाद यादव, अध्यक्ष, आरजेडी

पंतप्रधान ‘डबल इंजिन’ सरकार असा उल्लेख करतात. ज्या राज्यांत विरोधी पक्षांचे सरकार आहे तेथे त्यांचे ‘डबल इंजिन सरकार ‘डबल बॅरेल सरकार’ असते. यात ‘ईडी’, ‘सीबीआय’ डबल बॅरेल आहेत. जेथे ‘ईडी’, ‘सीबीआय’ सरकार पाडू शकत नाही, तेथे ‘घोडेबाजार’ केला जातो.

- कपिल सिब्बल, खासदार, सप

‘सीबीआय’ आणि ‘ईडी’ यांचे नामकरण आता ‘भाजप सेना’ असे करायला हवे. तमिळनाडूच्या मंत्र्यांवर छापा आणि अटकेचा आम्ही निषेध करतो. त्यांना झालेली अटक आक्षेपार्ह होती. सर्व भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये आश्रय मिळत आहे.

- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, नवी दिल्ली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com