दुचाकीवरच्या बेण्याने केला घोळ; बसच्या टपावरील स्टंटबाजी एकदा पाहाच !(व्हिडिओ)

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जून 2019

मुंबई:चेन्नईमध्ये एका बसच्या टपावरून २० हून अधिक मुल प्रवास करत होती. अचानक बससमोर दुचाकी येताच बस चालकाने ब्रेक लावला. यामुळे टपावरील सर्व मुले पत्त्यासारखी खाली कोसळली असल्याची घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा स्टंट कुणीही करु नये असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

मुंबई:चेन्नईमध्ये एका बसच्या टपावरून 20 हून अधिक मुल प्रवास करत होती. अचानक बससमोर दुचाकी येताच बस चालकाने ब्रेक लावला. यामुळे टपावरील सर्व मुले पत्त्यासारखी खाली कोसळली असल्याची घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा स्टंट कुणीही करु नये असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईतल्या पच्चई अप्पास कॉलेजचे विद्यार्थी महानगर परिवहनच्या बस क्रमांक ४० ए मधून प्रवास करत होते. ती बस प्रवाशांनी खच्चाखच भरली होती. त्यामुळे काही प्रवासी टपावर जाऊन बसले. कंडक्टर आणि चालकाच्या विरोधाला न जुमानता ते छतावर जाऊन बसले आणि डान्स करू लागले. बस रस्त्यावरून धावत असतानाच अचानक समोर दुचाकी आली आणि बसचालकाने ब्रेक मारला, बसचालकाने ब्रेक मारताच टपावरची सर्वच मुले खाली कोसळली. या प्रकरणी पोलिसांनी २४ विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chennai students climb, fall off moving bus while celebrating Bus Day