Chhath Puja 2022 : बिहारमध्ये छठपूजेदरम्यान ३५ जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhath Puja 2022

Chhath Puja 2022 : बिहारमध्ये छठपूजेदरम्यान ३५ जणांचा मृत्यू

पाटणा : बिहारमध्ये छठपूजेदरम्यान विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांत सुमारे ३५ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला व लहान मुलांची संख्या २५ आहे. रविवारी (ता. ३०) पहिले अर्घ घेण्यापासून सोमवारी दुसरे अर्घ घेण्यापर्यंतच्या कालावधीत या सर्वजणांनी प्राण गमावले. बिहारमध्ये छठपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. राज्यातील ३८ जिल्ह्यांमध्ये नदी व तलावाच्या किनारी भाविकांनी सूर्याला अर्घ दिले. मात्र, पाण्यात बुडून काहीजणांचा मृत्यू झाला.

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे अजूनही मृतांची आकडेवारी पोचत असून आतापर्यंत २२ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची विभागाने पुष्टी केली आहे. विभागाच्या माहितीनुसार समस्तीपूर, मुझफ्फरपूरमध्ये प्रत्येकी तीन, कटिहार, मधेपुरा, भागलपूर, रोहतासमध्ये प्रत्येकी दोन तर कैमूर, नवादा, अररिया, सीतामढी, वैशाली, सहरसा, पाटण्यात प्रत्येकी एका व्यक्तीने छठपूजा साजरी करताना प्राण गमावले.

टॅग्स :BiharsunworshipTradition