छत्रपती संभाजीनगर : एका विवाहित तरुणीने तिच्या पतीचा केवळ ४५ दिवसांत काटा काढल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमधून (Aurangabad Crime) समोर आली आहे. महिलेचे तिच्या मामासोबत अनैतिक संबंध होते आणि पती या नात्यात अडथळा ठरत असल्याने तिने खून करण्याचा कट रचल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिघांना अटक केली आहे.