
नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, युद्धनीती, आरमार स्थापना, शिवराज्याभिषेक यांसारख्या तपशीलातून अमराठी प्रेक्षक अभ्यासकांपर्यंत शिवचरित्राची माहिती पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक संग्रहालयालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक राष्ट्रीय समितीतर्फे हे संग्रहालय उभारण्यात आले असून शिवराज्याभिषेक दिनी संग्रहालय सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे.