
रायपूर : राज्यातील वाघांची घटती संख्या आणि व्याघ्र संवर्धनाच्या हेतूने छत्तीसगड सरकारने बुधवारी ‘टायगर फाउंडेशन सोसायटी’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री विष्णू देव साय यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या सरकारी निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीत ‘छत्तीसगड टायगर फाउंडेशन सोसायटी’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे जनसंपर्क विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.