

pension benefits
esakal
रायपूर: नक्षल हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलिस कॉन्स्टेबलच्या ६८ वर्षीय आईला कौटुंबिक पेन्शन नाकारणे अत्यंत अन्यायकारक असल्याचे निरीक्षण छत्तीसगड उच्च न्यायालयाने नोंदवले असून छत्तीसगड सरकारला सहा आठवड्यांत त्यांच्या प्रकरणावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रमेश सिन्हा आणि न्यायाधीश रवींद्र कुमार अग्रवाल यांच्या पीठाने ११ फेब्रुवारीला हा आदेश दिला.