पतीच्या ऑफीसमध्ये जाऊन शिवीगाळ करणं पत्नीची क्रूरताच; उच्च न्यायालयाचं निरीक्षण

Court Order
Court Order

बिलासपूर : छत्तीसगड उच्च न्यायालयाने पती-पत्नी वादावर महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे. येथील एका पत्नीने आपल्या पतीवर दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत मंत्र्यांकडे पतीच्या बदलीची विनंती केली. पत्नीच्या या कृतीला उच्च न्यायालयाने क्रुरता संबोधलं आहे. तसेच कौटुबिक न्यायालयात पत्नीने दाखल केलेल्या घटस्फोटाविरुद्धचा अर्जही फेटाळला आहे. (Chhattisgarh high court news in Marathi)

Court Order
धाडीत काहीच न मिळाल्याने सीबीआयची क्लिन चीट; सिसोदियांचा दावा

अधिवक्ता सी. जयंत राव यांनी सांगितले की, छत्तीसगड उच्च न्यायालयाने पत्नीने पतीविरुद्ध मंत्र्याकडे केलेली तक्रार आणि कोणत्याही तथ्याशिवाय महिला सहकाऱ्यासोबत अनैतिक संबंधाच्या आधारे पतीच्या बदलीची केलेली विनंती क्रूरता मानली आहे. अधिवक्ता राव पुढं म्हणाले की, पत्नीचे वारंवार पतीच्या कार्यालयात जाणे आणि अपशब्द बोलून वातावरण बिघडवणे हे देखील क्रौर्यच आहे. पत्नीच्या अशा छळाचा बळी ठरलेल्या पतीला घटस्फोटाचा अधिकार आहे, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे.

न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि न्यायमूर्ती राधाकिशन अग्रवाल यांच्या खंडपीठाने घटस्फोटाविरोधातील पत्नीचे अपील फेटाळून लावत कौटुंबिक न्यायालयाचा घटस्फोट देण्याचा निर्णय कायम ठेवला.

Court Order
माहित नव्हतं एवढं महागात पडेल; मोदींच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया

अधिवक्ता राव यांनी सांगितले की, धमतरी जिल्ह्यातील कुरुड येथे तैनात असलेल्या एका उपअभियंत्याने 2010 मध्ये रायपूर येथील एका विधवा महिलेशी लग्न केले होते. लग्नानंतर त्यांना मूलही झाले. मात्र काही काळानंतर पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.

दरम्यान महिलेने पतीवर आई-वडिलांपासून दूर राहण्यासाठी दबाव टाकला, त्यामुळे पतीला आई-वडिलांपासून वेगळे राहावे लागले. काही काळानंतर महिलेने तिच्या अधिकारी पतीवर एका सहकारी महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला. तसेच अनेकवेळा तिने पतीच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला आणि सर्वांसमोर पतीचा अपमान केला होतो, असही वकील राव यांनी म्हटलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com