Assembly Election 2023: छत्तीसगड-मिझोरम विधानसभेसाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

छत्तीसगढच्या 20 अन् मिझोरामच्या 40 विधानसभा जागांसाठी आज मतदान
administration election 31 thousand 983 voters registered in chhatrapati sambhajinagar in ten months
administration election 31 thousand 983 voters registered in chhatrapati sambhajinagar in ten monthsesakal

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना आता सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात मंगळवारी (7 नोव्हेंबर) छत्तीसगडमधील 20 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. मिझोराममधील सर्व 40 जागांसाठी मतदान होणार आहे. कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

छत्तीसगडमधील 20 जागांपैकी अनेक जागा नक्षलग्रस्त बस्तर विभागात आहेत. 20 जागांपैकी 12 जागा अनुसूचित जमातीसाठी आणि एक अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे.

छत्तीसगडमध्ये संध्याकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात

छत्तीसगडमधील 10 जागांवर सकाळी 7 वाजता मतदान सुरू झाले असून दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. तर उर्वरित जागांसाठी सकाळी ८ वाजता मतदान सुरू होणार असून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. तर मिझोरममध्ये मतदान 7 वाजता सुरू होईल आणि 4 वाजेपर्यंत चालेल.

administration election 31 thousand 983 voters registered in chhatrapati sambhajinagar in ten months
अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यास काय? आपने आखली पुढची रणनीती

छत्तीसगडच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, मतदानासाठी २५,२४९ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यासाठी 25 महिलांसह 223 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. या कालावधीत अंदाजे 40,78,681 मतदार मतदान करतील. यामध्ये 19,93,937 पुरुष, 20,84,675 महिला आणि 69 तृतीय पंथींचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यासाठी 5304 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.

administration election 31 thousand 983 voters registered in chhatrapati sambhajinagar in ten months
Udhayanidhi Stalin: हायकोर्टाच्या टीकेनंतरही उदयनिधी आपल्या वक्तव्यावर ठाम; म्हणाले, आंबेडकर, पेरियार...

छत्तीसगडमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, नक्षलग्रस्त बस्तर विभागातील 12 मतदारसंघात मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) 40,000 जवानांसह 60,000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

तर मिझोराममध्ये देखील कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे, येथील 8.57 लाखांहून अधिक मतदार 174 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. यामध्ये 18 महिलांचा समावेश आहे. मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) मधुप व्यास यांनी सांगितले की, मिझोराममधील सर्व 1,276 मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजता मतदान सुरू होईल आणि ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहील.

administration election 31 thousand 983 voters registered in chhatrapati sambhajinagar in ten months
Chhattisgarh: मतदानाच्या एक दिवस आधी घातपात! IED बॉम्बच्या स्फोटामुळे बीएसफ कर्मचाऱ्यासह दोघे जखमी

३० मतदान केंद्रे संवेदनशील केली घोषित

यातील १४९ मतदान केंद्रे रिमोट असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेली 30 मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी सुमारे 3,000 पोलीस कर्मचारी आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) ची मोठी तुकडी तैनात करण्यात आली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 सदस्यीय मिझोरम विधानसभेसाठी मतदानापूर्वी, म्यानमारसह 510 किमी लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आणि बांगलादेशला लागून असलेली 318 किमी लांबीची सीमा सील करण्यात आली आहे. याशिवाय आसामचे तीन जिल्हे, मणिपूरचे दोन जिल्हे आणि त्रिपुराच्‍या एका जिल्‍ह्याला लागून असलेली आंतर-राज्य सीमा बंद करण्‍यात आली आहे.

सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF), झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) आणि काँग्रेसने प्रत्येकी 40 उमेदवार उभे केले आहेत. भाजप आणि आम आदमी पार्टी (आप) अनुक्रमे 23 आणि 4 जागांवर लढत आहेत. याशिवाय 27 अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत. मिझोराममध्ये एकूण 8,57,063 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ४,३९,०२६ महिला मतदारांचाही समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com