
Toxic Cold Syrup
sakal
छिंदवाडा(मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशातील छिंदवाड्यात मूत्रपिंड निकामी झाल्याने गेल्या काही दिवसांत १४ मुलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून मध्य प्रदेशचे आरोग्यमंत्री राजेंद्र शुक्ल यांना तातडीने पदावरून हटवा अशी मागणी मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या मुलांचा मृत्यू दुषित कफ सिरप कोल्ड्रिफ घेतल्यामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.