esakal | के.व्ही.सुब्रमण्यम मुख्य आर्थिक सल्लागार पदाचा देणार राजीनामा | Subramanian
sakal

बोलून बातमी शोधा

के.व्ही.सुब्रमण्यम मुख्य आर्थिक सल्लागार पदाचा देणार राजीनामा

के.व्ही.सुब्रमण्यम मुख्य आर्थिक सल्लागार पदाचा देणार राजीनामा

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: भारत सरकारचे (indian govt) मुख्य आर्थिक सल्लागार के.व्ही.सुब्रमण्यम (K V Subramanian) लवकरच शिक्षण क्षेत्रामध्ये परतणार आहेत. सुब्रमण्यम मुख्य आर्थिक सल्लागार पदावरुन (Chief Economic Adviser) पायउतार होणार आहेत. के.व्ही.सुब्रमण्यम यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. आयएसबी हैदराबादचे प्राध्यापक असलेले के.व्ही.सुब्रमण्यम यांची मोदी सरकारने डिसेंबर २०१८ मध्ये मुख्य आर्थिक सल्लागार पदावर नियुक्ती केली होती. अरविंद सुब्रमण्यम (Arvind Subramanaian) यांच्या राजीनाम्यानंतर के.व्ही.सुब्रमण्यम यांची मुख्य आर्थिक सल्लागारपदावर नियुक्ती झाली होती.

पाठिंबा आणि प्रेरणादायी नेतृत्वाबद्दल सुब्रमण्यम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे आभार मानले आहेत. "माझा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मी पुन्हा शैक्षणिक क्षेत्रात परतण्याचा निर्णय घेतला आहे" असे के.व्ही.सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे.

"के.व्ही.सुब्रमण्यम यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच आनंददायी होता. त्यांची शैक्षिणक गुणवत्ता तसेच आर्थिक आणि अन्य धोरणात्मक विषयांवर वेगळा दृष्टीकोन याचा फायदा झाला. भविष्यातील प्रयत्नांसाठी त्यांना शुभेच्छा" असे मोदींनी म्हटले आहे.

loading image
go to top