
शांतता तेव्हाच कायम राहील, जेव्हा लोकांची... : सरन्यायाधीश रमणा
नवी दिल्ली : शांतता तेव्हाच कायम राहील, जेव्हा लोकांची प्रतिष्ठा आणि हक्क मान्य केले जाईल. त्यांचे रक्षण केले जाईल, असे सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा (Chief Justice Of India N.V.Ramana) म्हणाले. श्रीनगर येथे उच्च न्यायालय भवनाच्या उद्घाटनप्रसंगी शनिवारी (ता.१४) ते बोलत होते. परंपरा निर्माण करण्यासाठी केवळ कायदेच पर्याप्त नाही. त्यासाठी आदर्श मूल्य असलेल्या लोकांनी कायदेविषयक रचनेत येण्याची गरज असल्याचे सरन्यायाधीश रमणा म्हणाले. न्याय नाकारणे म्हणजे अराजकतेकडे घेऊन जाणे. त्यामुळे लवकरच न्यायपालिका (Judiciary) अस्थिर होईल. लोक न्यायेत्तर पर्यायाचा शोध घेतील. (Chief Justice Of India N.V.Ramana Says Rights And Dignity Important)
हेही वाचा: सहकार क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिक व्यापक हवा : शरद पवार
शांतता तेव्हाच कायम राहिल, जेव्हा लोकांची प्रतिष्ठा आणि हक्कांना मान्यता दिली जाईल. त्याचे संरक्षण केले जाईल. या प्रसंगी सरन्यायाधीश रमण यांनी कवी अली जवाद झैदी आणि प्रसिद्ध कवी रिफत सरफरोश यांचा संदर्भ दिला. जलद न्यायालयीन निर्णय हे सुदृढ लोकशाहीची ओळख आहे. कोणत्याही देशात परंपरा निर्माण करण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नसतात.
हेही वाचा: देशात सरकार सर्वात मोठे याचिकाकर्ते; एन.व्ही. रमणा
आदर्श मूल्य जपणाऱ्या लोकांची न्यायालयीन व्यवस्थेत येणे आवश्यक आहे. आदरणीय न्यायाधीशांनो आणि न्यायिक अधिकाऱ्यांनो तुम्ही आपल्या संवैधानिक योजनेत खूप महत्त्वाची भूमिका पार पाडता, असे सरन्यायाधीश रमणा म्हणाले.
Web Title: Chief Justice Of India Nvramana Says Rights And Dignity Important
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..