
Akhilesh Yadav : काकांचा सन्मान करा; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा अखिलेश यादव यांना खोचक सल्ला
लखनौ : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवपाल सिंह यादव यांच्या बहाण्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत योगी आदित्यनाथ यांनी जोरदार हल्लाबोल केला.
आदित्यनाथ म्हणाले, 'मी 'सबका साथ, सबका विकास'बद्दल बोलतो, पण किमान या बहाण्याने तुम्ही काकाश्रींनाही सन्मान देण्यास सुरुवात केली आहे.
योगी पुढं म्हणाले " शिवपालजी, जेव्हा मी तुम्हाला बघतो तेव्हा मला महाभारतातील दृश्य आठवू लागते. तुमच्यासारख्या अनुभवी लोकांची प्रत्येक वेळी अक्षरशः फसवणूक होते. त्यांचा वारंवार अपमान केला जातो. आम्ही तुमचा आदर करतो. तुम्ही आमचे ज्येष्ठ सदस्य आहात आणि तुम्हाला सन्मानही मिळायला हवा. शिवपाल यांचा एवढा अपमान का केला? त्यांचा साधा स्वभाव पाहता मी सांगू इच्छितो की, त्यांचा आदर करायला सुरुवात करा, असा सल्ला योगींनी सपानेते अखिलेश यांना दिला.
अखिलेश यांच्यावर निशाणा साधताना योगी म्हणाले की, सत्तेचा वारसा मिळू शकतो, पण शहाणपण मिळवता येत नाही. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आपला राग कमी केला तर ते राज्याला नाही किमान कुटुंबाला एकत्र आणू शकतील.