

बिजिंग : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर ३४ टक्के एवढे आयातशुल्क आकारल्यानंतर आता चीनने देखील त्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. चीनने अमेरिकी वस्तूंवर ३४ टक्के एवढे आयातशुल्क लादले आहे. यामुळे दोन मोठ्या अर्थसत्तांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. आता येत्या १० एप्रिलपासून चीनकडून लादण्यात आलेल्या आयातशुल्काची अंमलबजावणी होईल असे शिन्हुआ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.