‘आर्ट ऑफ वॉर’ म्हणजे काय? चीनला न लढता जिंकायचेय तैवान; भारताला बसलायं फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

China-Taiwan Latest News

Art Of War म्हणजे काय? चीनला न लढता कसे जिंकायचेय तैवान; भारताला बसलायं फटका

नवी दिल्ली : अमेरिकन संसदेच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान (Taiwan) दौऱ्यामुळे चीन (China) संतापला आहे. तो सतत अमेरिका (America) व तैवानला बघण्याची धमकी देत ​​आहे. तैवानला धडा शिकवण्यासाठी चीनकडून हल्ला केला जाऊ शकतो. परंतु, चीनची रणनीती ज्यांना समजते त्यांचा असा विश्वास आहे की, चीन हल्ला करणार नाही. कारण, चीन तैवानवर हल्ला करून बरेच काही साध्य करेल अशा स्थितीत स्वत:ला पाहण्यास असमर्थ आहे. अशा स्थितीत त्यांनी ‘आर्ट ऑफ वॉर’अंतर्गत न लढता तैवान जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

‘आर्ट ऑफ वॉर’ हा चिनी (China) लष्करी रणनीतीकार आणि विचारवंत सन त्झू यांचा सिद्धांत आहे. ५०० वर्षांपूर्वी त्यांनी या नावाने पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात शत्रूशी सामना करण्यासाठी इतकी तयारी केली पाहिजे की आपल्याला लढण्याची गरजच पडणार नाही. याचा अर्थ प्रतिस्पर्ध्यावर इतका दबाव टाका की त्याने स्वतः शरणागती पत्करावी. चीनच्या युद्ध रणनीतीवर या कलेची छाप नेहमीच दिसून आली आहे. डोकलाम, लडाख सारख्या भागात सीमेवर अतिक्रमण करून भारतासोबतचा (India) तणाव अनेक महिने टिकवून ठेवणे आणि त्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणे हा देखील अशाच एका रणनीतीचा भाग आहे.

हेही वाचा: Kuldeep Bishnoi : बिश्नोई यांचा आमदारकीचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार

चीन दक्षिण चीन समुद्रातही असेच करीत आहे. येथे तो जपान, व्हिएतनामसह अनेक देशांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न करीत आहे. या माध्यमातून चीन केवळ दबावात ठेवण्याचाच प्रयत्न करीत नाही तर वेळेची वाट पाहत आहे. १९६२ मध्ये भारतावर अचानक हल्ला करून त्यांनी तेच केले. याशिवाय चीनने तिबेटवर अचानक हल्ला करून तिबेटींचे बंड कमजोर केले होते.

चीन हल्ला करणार नाही

ड्रॅगन पुन्हा अशीच रणनीती अवलंबू शकतो. सध्या अमेरिकेचा वरचष्मा आहे. युद्ध झाल्यास ते चीनवर आर्थिक निर्बंध लादू शकते. त्यामुळे चीन तैवान आणि अमेरिकेला (America) धमकी देत राहील; पण, हल्ला करणार नाही. अमेरिकेच्या लष्कराच्या तुलनेत चीन खूप मागे आहे. अशा स्थितीत चीन काही दशकांपर्यंत आपली आर्थिक आणि लष्करी ताकद झपाट्याने वाढवेल, असे चीन व तैवानमधील संबंध समजून घेणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सतत दबाव टाकण्याचा प्रयत्न

युक्रेन-रशिया युद्धातूनही चीन शिकला आहे. चीनला रशियाप्रमाणे तैवानमध्ये अडकायचे नाही. अशा स्थितीत सतत दबाव आणत असताना चीन स्वतःला अशा स्थितीत ठेवायचे आहे की, अमेरिकेने तैवानमध्ये ढवळाढवळ करू नये आणि तैवानला (Taiwan) आपल्या ताब्यात घेता यावे. हेच ‘आर्ट ऑफ वॉर’चे तत्त्व आहे.

Web Title: China Taiwan Art Of War India America

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..