esakal | चीनची भारताला धमकी; युद्ध झालं तर हाराल
sakal

बोलून बातमी शोधा

India-China Border

चीनची भारताला धमकी; युद्ध झालं तर हाराल

sakal_logo
By
सुधीर काकडे

भारत आणि चीनदरम्यान कॉर्प्स कमांडर स्तरावरच्या चर्चेची १३वी फेरी रविवारी पार पडली. मात्र, चर्चेची ही फेरीही निष्फळ ठरल्याने सीमावर्ती भागात पुन्हा एकदा तणाव वाढणार असल्याचे संकेत मिळता आहे. त्यातच चीनने भारताला थेट धमकी दिल्याचं समोर आलं आहे. गलवान खोऱ्यात चीनने सैन्य तैनात केल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध चिघळायला सुरुवात झाली. यानंतर सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र चीनच्या कुरघोड्यांनी यामध्ये अडथळे येत आहेत. त्यातच आज चर्चेची १३ फेरी झाल्यानंतर चीनने पून्हा एकदा गरळ ओकल्याचं दिसतं आहे.

चीनचा सरकारी वृत्त समुह असलेल्या ग्लोबल टाईम्समधून चिनने भारताला धमकी दिल्याचं समोर आलं आहे. भारताला हवी तशी सीमा रेषा होणार नाही अशी भुमिका चीनने घेतल्याचं दिसतं आहे. तसेच जर युद्ध झालं तर भारत हारेल अशी धमकी देखील चीननं दिली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गलवान खोरे, गोग्रा हॉट स्प्रींग्स आणि वादग्रस्त ठिकाणांवरून भारत आणि चीन सीमेवर अनेकदा संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आता चीननं घेतलेल्या भुमिकेवर भारत काय भुमिका घेतो हे पाहावं लागणार आहे.

loading image
go to top