
:- नंदकुमार बस्वदे
China Building Biggest Dam: नेहमीच चर्चेत असणार भारताचा उचापती शेजारी देश चीन पुन्हा एकदा भारताची आणि जगाची चिंता वाढवणार आहे. सध्या जगातील थ्रीगॉर्जेस डॅम हे सर्वात मोठे धरण चीनमध्ये असून त्या धरणामुळे पृथ्वीच्या गतीवर परिणाम झाला आहे असे सांगितले जात आहे. पण आता चीन त्याहीपेक्षा मोठे धरण उभारणार आहे.
हे धरण भारताची चिंता वाढवणारे ठरणार आहे. भारत आणि चीन सीमेच्या जवळ चीन ब्रम्हपुत्रा नदीवर हे नवीन धरण उभारणार आहे. चीनच्या शी जिनपिंग सरकारने या प्रकल्पाला मंजूरी दिली आहे.