चीनमधील मोबाईल प्रकल्प सॅमसंगकडून लवकरच बंद

रॉयटर्स
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

चीनमधील मोबाईल उत्पादन प्रकल्प बंद करण्याचा विचार दक्षिण कोरियातील सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपनी करीत आहे. चीनमध्ये कंपनीच्या मोबाईलची कमी झालेली विक्री आणि वाढता कामगार खर्च यामुळे सॅमसंग हे पाऊल उचलण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 
 

सोल : चीनमधील मोबाईल उत्पादन प्रकल्प बंद करण्याचा विचार दक्षिण कोरियातील सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपनी करीत आहे. चीनमध्ये कंपनीच्या मोबाईलची कमी झालेली विक्री आणि वाढता कामगार खर्च यामुळे सॅमसंग हे पाऊल उचलण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

तियानजिन सॅमसंग टेलिकॉन टेक्‍नॉलॉची हा सॅमसंगचा मोबाईल उत्पादन प्रकल्प आहे. हा प्रकल्प बंद करण्याच्या प्रस्तावावर कंपनी गांभीर्याने विचार करीत आहे. याविषयी कंपनीने म्हटले आहे, की तियानजिन प्रकल्पाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. चीनमधील स्मार्टफोनची बाजारपेठ मंदावल्याने कंपनीसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. कंपनी या प्रकल्पात स्पर्धात्मकता आणि कार्यक्षमता वाढावी, यावर सध्या भर देत आहे.

चीन ही जगातील सर्वांत मोठी स्मार्टफोन बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत सॅमसंगचा हिस्सा केवळ एक टक्का आहे. चीनमधील हुवेई आणि इतर स्थानिक कंपन्या बाजारपेठेत आघाडीवर आहेत. चीनमधील या स्थानिक कंपन्याशी स्पर्धा करताना सॅमसंगला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. 

Web Title: Chinas mobile project will soon be shut down by Samsung