Xi Jinping : चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडून अहमदाबाद विमान दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त
Ahmedabad plane crash : अहमदाबादमधील विमान अपघातात झालेल्या जीवितहानीवर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान ली कियांग यांनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांना शोकसंदेश पाठविला. याप्रसंगी गुगलने सर्च इंजिनच्या होमपेजवर काळ्या रिबिनचा आयकॉन दर्शवून श्रद्धांजली अर्पण केली.
बीजिंग : अहमदाबादेतील विमान दुर्घटनेबद्दल चीनने शोक व्यक्त केला असून, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोकसंदेश पाठविला आहे.