चीनी हॅकर्सकडून भारतीय पॉवर ग्रीड लक्ष्य, अहवालातून माहिती उघड

गुप्त माहितींचे रेकॉर्ड ठेवणाऱ्या एका कंपनीने याबद्दलची माहिती दिली आहे.
cyber crime.jpg
cyber crime.jpg

अलीकडच्या काही महिन्यांत चीनमधील हॅकर्सनी भारताविरुद्ध मोठा कट रचला असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्त माहितींचे रेकॉर्ड ठेवणाऱ्या एका कंपनीने याबद्दलची माहिती दिली आहे. या कंपनीने प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे की, चीनी हॅकर्सकडून सायबर गुन्ह्याचा वापर करुन भारतीय पॉवर ग्रीड लक्ष्य करण्यात आली आहेत. चिनी हॅकर्सनी उत्तर भारतातील किमान सात 'लोड डिस्पॅच' केंद्रांना यामध्ये लक्ष केलं आहे. या केंद्रांचे काम पूर्व लडाखमधील भारत-चीन सीमेजवळील भागात ग्रीड नियंत्रण आणि वीज वितरणासाठी रिअल-टाइम ऑपरेशन्स पार पाडणे हे यांचे काम असणार आहे.

cyber crime.jpg
देशातील तब्बल सात टक्के बालके कुपोषित; स्मृती इराणींची माहिती

दरम्यान, अहवालानुसार, लोड डिस्पॅच सेंटरपैकी एकावर यापूर्वी रेडइको या हॅकिंग ग्रुपने हल्ला केला होता. याबाबत सांगितले जाते की, हा ग्रुप एका मोठ्या हॅकिंग ग्रुपमध्ये सहभागी झाला आहे. या मोठ्या हॅकिंग गटाचे चीन सरकारशी थेट संबंध असल्याचे अमेरिकेनेही सांगितले आहे. एका अहवालात म्हटल्याप्रमाणे, चीन सरकारशी संबंधित हॅकिंग गटांद्वारे भारतीय पॉवर ग्रिडवर दीर्घकाळापर्यंत हल्ले झाल्यामुळे आर्थिक हेरगिरीसंदर्भातील पारंपारिक गुप्त माहिती गोळा झाली आहे. त्यामुळे याद्वारे महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांबद्दल माहिती गोळा करुन ती भविष्यातसाठी वापरली जाऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे.

cyber crime.jpg
OBC आरक्षण कायद्याला आव्हान, आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com