Chinese Woman : चिनी महिलेला तिबेटी मठातून अटक; संशयास्पद कागदपत्रं सापडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mandi Police

ही महिला इथं बौद्ध धर्माचं शिक्षण घेण्यासाठी आली आहे.

Chinese Woman : चिनी महिलेला तिबेटी मठातून अटक; संशयास्पद कागदपत्रं सापडली

मंडी : हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात (Mandi Himachal Pradesh) पोलिसांनी (Police) जोगिंदरनगर चौंतरा येथील तिबेटी मठातून (Tibetan Monastery) एका चिनी वंशाच्या महिलेला अटक केलीय. ही अटक 22 ऑक्टोबरच्या रात्री झाली असली तरी पोलिसांनी संपूर्ण प्रकरण गोपनीय ठेवलं होतं.

येथील एका तिबेटी मठात गेल्या 15 दिवसांपासून एक महिला राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, जी स्वतःला नेपाळी वंशाची असल्याचं सांगत आहे. मात्र, ही महिला नेपाळची (Nepal) रहिवासी असल्याचं दिसून येत नाहीय. ही महिला इथं बौद्ध धर्माचं (Buddhism) शिक्षण घेण्यासाठी आली आहे. त्याआधारे पोलिस पथकानं घटनास्थळी जाऊन तपास केला. महिलेची चौकशी करून तिच्या खोलीचीही झडती घेतली असता खोलीतून काही संशयास्पद कागदपत्रं सापडली.

हेही वाचा: धक्कादायक! जंगलात तब्बल 40 माकडांचे मृतदेह सापडल्याने खळबळ; विषबाधेची शक्यता

या कागदपत्रांमध्ये महिलेची काही कागदपत्रं चीनमधील (China) तर काही नेपाळमधील आहेत. दोन्ही कागदपत्रांमध्ये महिलेचं वयही वेगवेगळं नमूद केलं गेलंय. त्याचबरोबर महिलेकडून 6 लाख 40 हजार रुपयांचं भारतीय चलन आणि 1 लाख 10 हजार रुपयांचं नेपाळी चलनही जप्त करण्यात आलं आहे. या संशयास्पद बाबी लक्षात घेऊन पोलिसांनी सदर महिलेला अटक केलीय. महिलेकडं दोन मोबाईल फोनही होते, ते पुढील तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. 23 ऑक्टोबरला या महिलेला जोगिंदरनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आलं, तेथून तिला 27 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

हेही वाचा: Uber Cab चालकामुळं महिला प्रवाशाचं फ्लाइट चुकलं; आता कंपनीला भरावे लागणार 20 हजार रुपये