बंगळूर : चिन्नास्वामी स्टेडियम दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री जी. परमेश्वर (G Parameshwara) यांचे खाते बदलले जाण्याची शक्यता आहे, असे तुमकुरमधील भाजप आमदार सुरेश गौडा यांनी सांगितले. त्यांनी आरोप केला की, परमेश्वर यांचे अपयश अधोरेखित केले जात आहे आणि इतरांकडून त्यांच्या खात्यात हस्तक्षेप केला जात आहे. तथापि, परमेश्वर यांनी खाते बदलाची शक्यता फेटाळून लावली आहे.