
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान यांनी बिहारमधील नीतीश सरकारवर गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांवरून तीव्र निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, बिहारमध्ये एकापाठोपाठ एक गुन्हेगारी घटनांची मालिकाच सुरू झाली असून, प्रशासन गुन्हेगारांसमोर पूर्णपणे हतबल दिसत आहे.