राज्याला प्रतिष्ठा मिळवून देईन : चिराग पासवान

Chirag-Paswan
Chirag-Paswan

बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाचे देशभर पडसाद उमटत आहेत, नितीशकुमार आणि भाजप यांनी सगळी ताकद पणाला लावली असली तरीसुद्धा चर्चा मात्र तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या दोन तरुण तुर्कांच्या सभांची होताना दिसते. बिहारमध्ये मंगळवारी (ता.३) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे त्यापार्श्वभूमीवर ‘सकाळ’चे प्रतिनिधी उज्ज्वलकुमार यांनी दोन्ही नेत्यांशी साधलेला संवाद.

प्रश्‍न - या निवडणुकीत कोणत्या मुद्द्यावर भर देण्यात आला आहे?
‘बिहार फर्स्ट - बिहारी फर्स्ट’ या मुद्यावर ही निवडणूक लढत आहे. बिहारची लयाला गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देणे, युवकांना रोजगार देणे, राज्यात उद्योग वसाहती निर्माण करणे हे आमचे प्रमुख मुद्दे आहेत. मी अतिमहत्त्वाकांक्षी आहे अशा अफवा पसरविण्यात आल्या आहेत. मी नितीश कुमार यांचा विरोधात आहे, असेही सांगण्यात येते. पण हे खरे नाही. बिहारचा विकास सात संकल्प करून होणार नाही तर मागास समजल्या जाणाऱ्या बिहारला ‘नली-गली’तून बाहेर काढत विकसित राज्यांच्या पंगतीत आणून बसवायचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नळपाणी योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. ‘भाजप-एलजेपी’ सरकार सत्तेवर आल्यानंतर याची व्यापक चौकशी करून दोषींना तुरुंगात धाडले जाईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तुम्ही घेतलेल्या भूमिकेमुळे वाटाघाटी बिघडल्या, असे अमित शहा म्हणत आहेत?
अमित शहा योग्यच सांगत आहेत. मी त्यांना दोन वेळा तर जे. पी. नड्डा यांना चार वेळा भेटून माझे म्हणणे मांडले होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ची स्वतःची योजना असणे आवश्‍यक असल्याचे मी त्यांनी सांगितले होते. ‘सात संकल्प’ही तर महाआघाडीची योजना होती. नितीश कुमार हे २०१७मध्ये ‘एनडीए’चा हिस्सा बनले तेव्हाही ‘सात संकल्प’च लागू केले होते. यावेळी ही ‘सात संकल्प भाग -२’ जाहीर केला आहे. यामुळे माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. 

‘एलएजेपी’ला मत खाणारा पक्ष (वोटकटवा) असे मानले जात आहे.  अमित शहांनंतर भाजपचे बहुतांश नेते तुमच्या विरोधात बोलत आहेत?
‘एलएजेपी’ला मत खाणारा पक्ष, असे समजणे हा रामविलास पासवान यांचा अपमान आहे. अशा गोष्टी कोठून तयार होतात हे मला माहीत आहे. यामागे केवळ व एकमेव नितीश कुमारच आहेत. ते स्वतः बोलत नाहीत, पण दुसऱ्यांकडून वदवून घेतात. त्यांच्या दबावामुळे भाजपचे वरिष्ठ नेतेही त्यांची मर्यादा विसरत आहेत. प्रकाश जावडेकर यांच्या तोंडून अशी वक्तव्ये बाहेर पडत आहेत. ते मराठी आहेत. त्यांना ‘वोटकटवा’ हा शब्दही नीट उच्चारता येत नाही.

निवडणुकीनंतर तुम्ही ‘एनडीए’ला पाठिंबा देणार का?
निवडणुकीनंतर सत्तेवर येण्यासाठी भाजपला ‘एलजेपी’ची मदतीची गरज भासली तर ती घेणार का हे, त्यांनी आताच स्पष्ट करायला हवे. म्हणजे माझा मार्गही वेगळा होईल.

‘तुम्ही बिहारी वाटत नाही. तुम्ही संघर्ष केलेला नाही’, असे आरोप होत आहेत?
हा मार्ग ही माझ्या मर्जीने स्वीकारला आहे. माझ्यात संघर्षाची ठिणगी दिसली नसली तर जेथून मला उमेदवारी दिली असती, ती मी स्वीकारली असती. ही निवडणूक म्हणजे माझ्या अस्तित्वाची लढाई आहे. माझे वडीलही आता माझ्याबरोबर नाहीत. ते म्हणत असत ‘वाघाचा छावा असेल तर डरकाळ्यांनी जंगल दणाणून सोडेन’. मी छावा आहे आणि जंगल दणाणूनच सोडेन.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com