Bus Accident : भीषण अपघातात बसमधील पाच प्रवासी जळून खाक; ओळख पटवणं झालं होतं मुश्किल, दोघांचं ठरलेलं लग्न अन् काळाचा...
Chitradurga Seabird Bus Accident on NH-48 : चित्रदुर्ग जिल्ह्यातील सीबर्ड बस अपघातातील पाच मृतांची डीएनएद्वारे ओळख पटली असून, पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.
चित्रदुर्ग : हिरियूरजवळ झालेल्या सीबर्ड बस अपघातात (Chitradurga Bus Tragedy) मृत्युमुखी पडलेल्या पाच प्रवाशांची ओळख डीएनए अहवालातून निश्चित झाली आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी हे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सुपूर्द केले.