

Chitrakoot Deepdan Festival
sakal
धनत्रयोदशीपासून सुरू झालेल्या पाच दिवसीय दीपदान उत्सवाचा उत्साह चित्रकूटमध्ये शिगेला पोहोचला आहे. दिवाळीच्या अमावस्येच्या आदल्या दिवशी, म्हणजेच नरक चतुर्दशीला (छोटी दिवाळी), मंदाकिनी नदीचा किनारा आणि रामघाट दिव्यांच्या लखलखीत रोषणाईने उजळून निघाला. देशभरातून आलेल्या भाविकांनी सायंकाळी शुभमुहूर्तावर दीपदान करून सुख-समृद्धीची कामना केली.