कोरोना रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्यांनी हायड्रॉक्‍सी क्‍लोरोक्‍वाईन वापरावे

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 मार्च 2020

नॅशनल टास्क फोर्सने उपचारासंदर्भातील प्रोटोकॉल जारी केला. आणीबाणीच्या स्थितीत काही प्रमाणात हायड्रॉक्‍सी क्‍लोरोक्‍वाईनचा वापर करण्यास ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने मान्यताही दिली आहे. 

नवी दिल्ली : कोरोनाचे संशयित अथवा रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी हायड्रॉक्‍सी क्‍लोरोक्‍वाईनचा वापर करावा, अशी शिफारस आयसीएमआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी बलराम भार्गव यांनी सोमवारी केली. तसेच, कोविड 19 च्या संपर्कात आलेल्यांनी घरच्या घरी हायड्रॉक्‍सी क्‍लोरोक्‍वाईनचा वापर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. 

नॅशनल टास्क फोर्सने उपचारासंदर्भातील प्रोटोकॉल जारी केला. आणीबाणीच्या स्थितीत काही प्रमाणात हायड्रॉक्‍सी क्‍लोरोक्‍वाईनचा वापर करण्यास ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने मान्यताही दिली आहे. 

कोरोनाच्या संसर्गामुळे विविध राज्यांतील लॉकडाउन संदर्भात ते म्हणाले, "लॉकडाउनची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना बजावले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याची साखळी तोडण्यासाठी लागू केलेली बंदी मोडणे चुकीचे आहे.'' 

भार्गव म्हणाले, "खासगी प्रयोगशाळांना कोविड 19 ची चाचणी करण्यास परवानगी दिली आहे, त्यासाठी 12 प्रयोगशाळांनी नोंदणी केली असून, त्यांच्याकडून चाचणीही सुरू झाली आहे. या प्रयोगशाळांकडे 15हजार नमुने संकलन केंद्रे आहेत. देशात आतापर्यंत 415 रुग्ण आढळले असून, आणखी सात जणांचा मृत्यू झाला आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chloroquine and hydroxychloroquine: what to know about the potential coronavirus drugs