मोठी बातमी! सिनेमा हॉल 100 टक्के क्षमतेने सुरु करण्याला सरकारची परवानगी

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 31 January 2021

कोरोना महामारीच्या संसर्गामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले किंवा कमी क्षमतेने सुरु असलेले सिनेमा हॉल पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली- कोरोना महामारीच्या संसर्गामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले किंवा कमी क्षमतेने सुरु असलेले सिनेमा हॉल पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे मालकांना आता 100 टक्के क्षमतेने 1 फेब्रुवारीपासून सिनेमा हॉल सुरु करता येणार आहेत. असे असले तरी कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. मास्क वापरने, तसेच हॉलच्या बाहेर सहा फूटांचे शारीरिक अंतराचे पालन करने आवश्यक आहे. 
 

1 फेब्रुवारीपासून पूर्ण क्षमतेने सिनेमा हॉल सुरु करण्यास परवानगी असेल. पण, सर्व कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. ऑनलाईन तिकीट बुकिंग करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. सिनेमा हॉलमध्ये पाळावे लागणारे नियम आज जाहीर करण्यात येतील, असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

सरकारने सिनेमा हॉल सुरु करण्यास परवानगी दिली असली तरी कोरोनासंबंधी नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. थेटर आणि मल्टीप्लेक्स मालकांना शोचा टायमिंग काही अंतराच्या फरकाने ठेवावा लागणार आहे. तसेच ऑनलाईन तिकीट उपलब्ध करुन द्यावे लागणार आहेत. तसेच एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यासंबंधी एसओपी काढलं आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cinema halls can operate with 100 percent capacity