Udaipur Murder : भाजप नेत्याच्या आवाहनावर २४ तासांत १.३७ कोटींची देणगी

Citizens donated Rs 1.37 crore on the appeal of BJP leader
Citizens donated Rs 1.37 crore on the appeal of BJP leaderCitizens donated Rs 1.37 crore on the appeal of BJP leader

नवी दिल्ली : उदयपूरमध्ये दहशतवादी संघटनांशी संबंधित अतिरेक्यांनी हत्या केलेल्या कन्हैयालालच्या कुटुंबासोबत केवळ राजस्थानच्याच नव्हे तर देशभरातील लोकांची सहानुभूती आहे. कन्हैयालाल मृत्यूमुळे कुटुंबासमोरील आव्हान कमी करण्यासाठी लोकांनी उदार हस्ते देणगी दिली आहे. भाजप (BJP) नेते कपिल मिश्रा यांनी कन्हैयालालच्या कुटुंबासाठी क्राउड फंडिंगद्वारे २४ तासांत १.३७ कोटी उभे केले आहेत. (Citizens donated Rs 1.37 crore on the appeal of BJP leader)

कपिल मिश्रा यांनी सुरू केलेल्या मोहिमेत १२ हजारांहून अधिक लोकांनी क्षमतेनुसार मदत केली. ३० दिवसांत एक कोटी गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, अवघ्या २४ तासांत १.३७ कोटी रुपये जमा (donated) झालेत. चित्रपट निर्माते मनीष मुंद्रा यांनी ११ लाख रुपये दिले आहेत. देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी मदत पाठवली, असे कपिल मिश्रा म्हणाले.

Citizens donated Rs 1.37 crore on the appeal of BJP leader
Jaipur Murder | 'त्यांना फाशी द्या', कन्हैयालालच्या हत्येनंतर जयपूरमध्ये मोर्चा

‘उदयपूरमध्ये कन्हैया लालजींची हत्या. एका गरीब हिंदूची दहशतवाद्यांनी हत्या केली. कन्हैया लालजींच्या कुटुंबाची जबाबदारी आता आमची आहे. त्यांची बायको, मुले एकटे पडणार नाहीत’ असे ट्विट मोहिमेचा शुभारंभ करताना कपिल मिश्रा यांनी केले होते.

राजस्थान सरकारने ५१ लाख दिले

राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी कन्हैयालालच्या घरी जाऊन कुटुंबाला ५१ लाखांचा धनादेश सुपूर्द केला. कन्हैयालालच्या दोन्ही मुलांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. २८ जून रोजी मोहम्मद रियाझ आणि गौस मोहम्मद नावाच्या दोन आरोपींनी दुकानात घुसून कन्हैयालालची हत्या केली होती. नूपुर शर्माच्या समर्थनार्थ केलेल्या पोस्टमुळे ही हत्या करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com