esakal | नागरिकांना कोविनवर मिळणार आता ‘सिक्युरिटी कोड’
sakal

बोलून बातमी शोधा

Cowin App

नागरिकांना कोविनवर मिळणार आता ‘सिक्युरिटी कोड’

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोना प्रतिबंधक लस (Corona Preventive Vaccine) घेण्यासाठी कोविन (Covin) संकेतस्थळावर (Website) नोंदणी (Registration) केल्यानंतर अनेकजण नियोजित वेळेत लस घेत नाही. मात्र, त्यांनी लस (Vaccine) घेतल्याचा संदेश त्यांना मोबाईलवर (Mobile) मिळतो. यासारख्या त्रुटी आढळल्याने आता उद्यापासून (ता. ८ ) ‘कोविन’वर नोंदणीनंतर नागरिकांना चार अंकी ‘सिक्युरिटी कोड’ (Security Code) मिळणार आहे. 9Citizens will now get Security Code on Covin)

कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठीचा दिवस, वेळ आरोग्य मंत्रालयाच्या ‘कोविन’ प्रणालीद्वारे निश्चित केली जाते. मात्र, अनेकजण ठरलेल्या दिवशी प्रत्यक्ष लस घेण्यासाठी जात नाहीत. तरीही त्यांनी ठरलेल्या दिवशी लस घेतली आहे, असा मेसेज त्यांच्या मोबाईलवर जात असल्याचे केंद्र सरकारच्या निदर्शनास आले आहे. लसीकरण करणाऱ्यांकडून अशी चुकीची माहिती संगणक प्रणालीत नोंदल्या जात असल्याने हे प्रकार घडत आहेत. नोंदणी प्रक्रियेतील त्रुटी कमी करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी कोविन प्रणालीकडून चार अंकी सुरक्षा कोड नागरिकांना पाठविला जाणार आहे. आता उद्यापासून नागरिकांना लसीची मात्रा देण्यापूर्वी लाभार्थीला चार अंकी सुरक्षा कोड विचारला जाईल आणि हा कोड कोविन प्रणालीत नोंदल्यानंतरच लसीकरणाच्या योग्य स्थितीची नोंद होईल.

हेही वाचा: योगींच्या आमदारांवर कोरोनाचा कहर; आतापर्यंत इतके मृत्यूमुखी

लसीकरणाच्या दिवस-वेळ निश्चितीसाठी ज्या नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे, अशा नागरिकांनाच हा कोड मिळेल. ऑनलाइन नोंदणीनंतर मिळणाऱ्या पावतीवर तो छापलेला असेल. लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्याला हा कोड दिसणार नाही. नोंदणीनंतर मिळणारी पावती मोबाइलमध्ये सुरक्षित करून ठेवता येईल आणि लसीकरणाच्या वेळी हा कोड बघता येईल. यामुळे नागरिकांच्या लसीकरणाची माहिती संगणक प्रणालीत योग्य रीतीने नोंदली जाईल, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.