
D.Y. Chandrachud : वकिलाची महिला वकिलांच्या क्षमतेवर टिप्पणी; सरन्यायाधीश संतापले; म्हणाले...
नवी दिल्ली - महिला वकील ई-फायलिंग केसेस दाखल करण्यास सक्षम नाहीत, या वकिलाच्या वक्तव्यावर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
खटले अनिवार्य ई-फायलिंगसंदर्भातील अर्जावरील सुनावणीदरम्यान वकील म्हणाले की, महिला वकील आणि ज्येष्ठ नागरिकांचे ई-फायलिंग हे अवघड काम आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांना वकिलाची ही टिप्पणी आवडली नाही.
महिलां वकिलांसाठी ई-फायलिंग हे काम अवघड का आहे, अशी विचारणा न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी वकिलांना केली. स्त्रिया तंत्रज्ञानाचा वापर करू शकणार नाहीत, असा समज का आहे? हा प्रश्न विचारत सरन्यायाधीश म्हणाले की, महिला वकील पुरुष वकिलांपेक्षा अधिक टेक्नोसेव्ही आहेत.
एमपी उच्च न्यायालय बार एसोसिएशनने अनिवार्य ई-फाइलिंगविरोधात सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केली आहे. हा नियम (अनिवार्य ई-फायलिंग) रातोरात करण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे. तसेच यासाठी कोणाकडूनही सूचना घेण्यात आल्या नाहीत. आम्हाला किमान सहा महिन्यांची मुदत देण्यात यावी. कोणताही नियम पारदर्शकपणे अंमलात आणला पाहिजे. तंत्रज्ञानामुळे गोष्टी सोप्या होतात, अवघड नाहीत, असंही अर्जात म्हटलं आहे.