

Chief Justice of India Surya Kant addresses the Commonwealth Legal Education Association's Annual International Conference 2026 in Hyderabad, highlighting concerns over AI detection tools and academic fairness.
esakal
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वाढत्या वापरामुळे शिक्षण क्षेत्रासमोर नवी आव्हाने निर्माण होत असताना, केवळ एआय डिटेक्शन सॉफ्टवेअरच्या अहवालावरून विद्यार्थ्यांना शैक्षणिक गैरप्रकारांसाठी दोषी ठरवणे चुकीचे ठरू शकते, असा महत्त्वपूर्ण इशारा भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी दिला आहे. अशा प्रकारची सॉफ्टवेअर पूर्णपणे विश्वासार्ह नसल्याने प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही चुकीच्या पद्धतीने नकल करणारे किंवा फसवणूक करणारे ठरवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला केवळ मशीनने दिलेल्या निष्कर्षाच्या आधारे दोषी ठरवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.