

CJI Justice Surya Kant emphasizes inclusive and accessible justice at NALSA’s West Zone Regional Conference in Indore
Sakal
न्यायव्यवस्था अधिक सुलभ, सर्वसमावेशक आणि नागरिककेंद्री करण्यासाठी राष्ट्रीय विधिक सेवा प्राधिकरणाच्या (NALSA) वतीने इंदूरमध्ये ‘इंहेंसिंग एक्सेस टू जस्टिस’ या विषयावर वेस्ट झोन प्रादेशिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत, केंद्रीय कायदा राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्यासह सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांतील न्यायाधीश, विधिक सेवा प्राधिकरणांचे अधिकारी आणि कायदेतज्ज्ञ उपस्थित होते.