गुजरातमधील बारावी पास मुलाने 40 देशातील 25 हजार लोकांना गंडवलं

cyber crime
cyber crimee sakal
Summary

शुक्रवारी अहमदाबादच्या क्राईम ब्रँचने बारावी पास असलेल्या एका अट्टल सायबर गुन्हेगाराला अटक केली आहे. या २१ वर्षीय गुजराती मुलाने ४० देशातील तब्बल २५ हजार परदेशी लोकांना गंडा घातला आहे.

अहमदाबाद- शुक्रवारी अहमदाबादच्या क्राईम ब्रँचने बारावी पास असलेल्या एका अट्टल सायबर गुन्हेगाराला अटक केली आहे. या २१ वर्षीय गुजराती मुलाने ४० देशातील तब्बल २५ हजार परदेशी लोकांना गंडवलं आहे. आरोपीचं नाव हर्षवर्धन परमार असून पोलिसांच्या जाळ्यात अडकण्यापूर्वी तो चैनीचे जीवन जगत होता. हर्षवर्धन एका कामगाराचा मुलगा असून ते नारायण नगरमध्ये राहायचे. त्याची आई पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये सुईन म्हणून काम करते. 'Times now news' ने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (class 12 pass out gujrat man dupes 25000 foreign nationals of 40 countries)

ऐषोआरामात जगण्यासाठी हर्षवर्धनने 'डार्क वेब'चा आधार घेतला. या माध्यमातून तो सहजपणे पैसे कमावत होता. तो वस्तू खरेदी करण्यासाठी क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करायचा आणि याच वस्तू पुन्हा विकायचा. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने तीन महिन्यांच्या कालावधीत ५ कोटी रुपये कमावले होते. पाकिस्तानचा नागरिक झीया मुस्तफा याने त्याला कार्ड घोटाळा करण्यास शिकवले होते. यासाठी त्यांना एका रशियन हॅकर्सचीही मदत मिळाली होती. आरोपी क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती घ्यायचे.

cyber crime
कोविशिल्ड की कोवॅक्सिन, कोणती लस जास्त प्रभावी?

जेथे डिजिटल व्यवहारासाठी ओटीपी मागितला जात नाही, अशा देशातील नागरिकांना हर्षवर्धनने लक्ष्य केले. अहमदाबादमधून डार्क वेबसाठी इंटेरनेटचा वापर होत असल्याचे सायबर सेलच्या निदर्शनास आले. त्यानंतर अहमदाबाद क्राईम ब्रँचने सापळा रचून हर्षवर्धन परमारला पकडले. आरोपी क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती मिळवायचे. याचा वापर करुन ते महागड्या वस्तू खरेदी करायचे आणि याच वस्तू पुन्हा विकून रोख रक्कम मिळवायचे.

cyber crime
स्त्रीच्या उन्नतीसाठी ‘आदिशक्ती’

एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कार्डधारकाच्या अकाऊंटमध्ये असलेले पैसे आणि कोणत्या देशातील बँक आहे यानुसार रशियन हॅकर्सला प्रत्येक माहितीसाठी कमाल १०० डॉलर दिले. रशियन हॅकर्सकडून माहिती मिळाल्यानंतर तो क्रेडिट आणि डेबिट कार्ड माहिती गोळा करायचा. यासाठी हर्षवर्धनला पाकिस्तानी नागरिक मदत करत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com